लवकर निजला, लवकर उठला, तालमीत गेला, घासभर कमी जेवला, प्रामाणिकपणाने वागला आणि एके दिवशी गाडीखाली सापडून मेला.तसेच उशिरा निजला, उशिरा उठला, सिनेमाला गेला, तमाशा पहिला, हॉटेलात गेला, मुर्गीमटण जेवला, अजीर्ण झाले, पोटदुखी झाली, पेन्शन घेतली, प्रॉव्हिडंट फंड घेतला, घर बांधले आणि ९५ वर्षी एके दिवशी उचकीने मेला.
मित्रानो खरच विचार करण्यासाठी गोष्ट आहे.देवाने माणसाला जन्म तर दिलाय परंतु त्या जन्माचे कसे सोने करायचे हे फार कमी जणांना करता येते.वरील एक छोटस वाक्य खूप काही सांगून जातय.ज्यांनी हसण्यावारी घेतलंय त्यांनी परत एकदा विचार करा.आयुष्यात आपण आज पर्यंत काय केलंय हे नक्की आठवा.काहीतरी करण्याचा प्रयत्न करा.यश आज ना उद्या तुमच्या मागे नक्की येईल. त्यामुळे पुन्हा एकदा हेच सांगेन की वाचा आणि विचार करा.
0 टिप्पण्या