आधुनिक म्हणी - amhi marathi मराठी विनोदी म्हणी
आधुनिक म्हणी - amhi marathi मराठी विनोदी म्हणी

१) शिर सलामत तो हेअरकट पचास.
२) फोन गेला, पेजर गेला, हाती मोबाईल आला.
३) चोराच्या मनात बँकेची तिजोरी.
४) उचलला मोबाईल लावला कानाला.
५) पी दारू आणि हो उच्चभ्रू.
६) सिलेंडर सलामत तो शेगडी पचास.
७) सोलता येईना कांदा नासका.
८) हात लावीन तिथे कपबशी फोडीन.
९) पाटा गेला, रगडा गेला, हाती मिक्सर आला.
१०) पीठ पाहावे मळून, पोळ्या पहाव्या लाटून.
११) रिकामा नवरा घरी, दम बिर्याणीची फर्माइश करी.
१२) जिच्या हाती स्वयंपाकाची सूत्रे सारी, उभ्या कुटुंबाला बोटावर नाचवत राहील.
१३) पिझ्झापेक्षा बर्गर जड.
१४) भेसळीचे खाणार त्याला दुकानदार देणार!
१५) ज्याचा खावा पिझ्झा, त्याच्याबरोबर करावी मजा!
१६) चार दिवस हेल्मेट सक्तीचे, चार दिवस नंबर प्लेटचे!
१७) प्रयत्न मोबाइलचे बिल भरता खिसेही गळे!
१८) रोग लहान, बिल महान!
१९) रिकाम्या पर्सला हेलकावे फार!
२०) अम्यास मिनीटभर, लाईट रात्रभर!
२१) खिशात नाही चिल्लर, अन नाव करोडीमल!
२२) जया मिळे मंत्रीपद, तया सवलती फार!
२३) सिनेमा स्टोरीचं मूळ अन नटीच कूळ विचारू नये!
२४) प्रमोशन मिळाल्याचं सांगावं जनात, मेमो मिळाल्याचं ठेवावं मनात!
२५) भरवश्याच्या बॅट्समनला भोपळा.
२६) पुत्र व्हावा ऐसा गुंडा, त्याचा मंत्रिमंडळात झेंडा.
२७) राहायला नाही घर, म्हणे लग्न कर.
२८) सासू क्लबमध्ये, सून पबमध्ये.
२९) वंशाला हवा दिवा, ही म्हणते इश्श तिकडे जावा!
३०) खिशात नाही डोनेशन, घ्यायला चालला ऍडमिशन!
३१) स्क्रीनपेक्षा एम.एम.एस मोठा.
३२) जागा लहान, फर्निचर महान.
३३) रिकाम्या पेपरला जाहिरातीचा आधार.
३४) काटकसर करून जमवलं, इन्कमटॅक्समध्ये घालवल.
३५) स्मशानात गेलं सरपण, हाती घेतलं दर्पण.
३६) खिशात नाही आणा, मला बाजीराव म्हणा.
३६) कशाचीच नाही गती आणि मला म्हणा सभापती.
३७) दुखणं आलं जीवावर, कांदा भाकरी उरावर.
३८) मनोरंजन नको, रिंगटोन आवर.
३९) नाजूक मानेला मोबाईलचा आधार.
४०) ज्या गावचे बार, त्याच गावचे हवालदार.
४१) मूल करतात चॅनेल सर्व्ह, आईबाप करतात होमवर्क.
४२) खिशात नाही दमडी, उड्या मारतेय कोंबडी.
४३) मोठया घराचे पोकळ वासे.
४४) उघड्या सोबत नांगडा गेला आणि थंडीत कुडकूडून मेला.
४५) मूर्खाला शिव्यांचा मार.
अशाच प्रकारच्या विविध विनोदांसाठी आताच तुमच्या मित्रांसोबत शेयर करा. जिभेवर म्हणी, अफलातून म्हणी, मराठी विनोदी म्हणी, मराठी शैक्षणिक म्हणी .
धन्यवाद
1 टिप्पण्या
छान!
उत्तर द्याहटवा