नमस्कार
लिखाणामध्ये विरामचिन्हांना अतिशय महत्त्वाचे स्थान आहे.विरामचिन्ह योग्य त्या ठिकाणी देणे आवश्यक असते.जर एखादे चिन्ह नको त्या ठिकाणी दिल्यास त्या वाक्याचा वेगळाच अर्थ प्राप्त होतो.
Ex : मी चोरी करणार नाही, केल्यास मला शिक्षा करावी.
१. Capital Letters : इंग्रजीतील पहिल्या लिपीतील मुळाक्षरांना कॅपिटल लेटर्स म्हणतात.
१) नवीन वाक्याच्या सुरवातीचे अक्षर नेहमी कॅपिटल लिहावे.
Ex : He is naughty boy.
२) Proper noun (विशेषनामाचे) पहिले अक्षर नेहमी कॅपिटल लिहावे.
Ex : Ram, Himalaya, Panchganga, Kolhapur.
३) I हे सर्वनाम म्हणून लिहताना नेहमी कॅपिटल लिहावे.
Ex : May i come in, sir?
४) संक्षिप्त रूपे नेहमी कॅपिटल लिहावीत.
Ex : B.A. , P.T.O .
२. Full Stop (.) (पूर्ण विराम) : विधानार्थी किंवा आज्ञार्थक वाक्याच्या शेवटी Full Stop द्यावा.
Ex : १.Ram goes to school.
२. Open the door.
३. Question Mark (?) (प्रश्नचिन्ह) : प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी व Question Tag च्या शेवटी प्रश्नचिन्ह द्यावे.
Ex : १. Are you a doctor ?
२. I can swin, Can't I ?
४. Exclamation Mark (!) (उदगारवाचक चिन्ह) : उदगारवाचक वाक्याच्या शेवटी व केवल प्रयोगी अव्ययाच्या शेवटी Exclamation Mark देतात.
Ex : १. How lucky I am ?
२. Oh ! Alas ! Hush !
५. Comma (,) स्वल्पविराम : १.एकाच वाक्यात एकाहून अधिक नामांचा उल्लेख असेल तर नामानंतर comma द्यावा मात्र शेवटच्या नामपूर्वी and हा शब्द घ्यावा.
Ex : १.Ram, Shyam, Seeta and Geeta lived in village.
२. Reporting verb (R.V) नंतर comma देतात.
६. Inverted Comma's ("_ _ _ _") (अवतरण चिन्ह) : Direct वाक्यामध्ये R.S मधील भाग Inverted Comma's मध्ये ठेवला जातो. एखाद्या व्यक्तीच्या तोंडचे वाक्य दुसऱ्या व्यक्तीस जसे आहे तसे सांगतल्यास ते Inverted Comma's मध्ये ठेवावे.
Ex : Hari said, "We are good friends."
७. Apostophe (') : १. याला सष्ठीचा प्रत्यय मानतात. याचा वापर नामाला जोडून करावा. याचा अर्थ of (चा, ची , चे) सारखा असतो.
Ex : Setaa's book, Ram's dog.
२. अक्षरांचा लोप करण्यासाठी याचा वापर होतो.
Ex : don't = do not, I'm = I am, didn't = did not
८. Hyphen (-) (संयोग चिन्ह) : दोन वेगवेगळे शब्द एकत्र जोडून त्यापासून एक शब्द तयार करण्यासाठी याचा वापर करतात.
Ex : Ink-pot, Rose-set, Bus-stand.
0 टिप्पण्या