Types Of Tense (काळ व त्याचे प्रकार) :
प्रत्येक भाषेमध्ये काळाला फार महत्त्व आहे. काळ म्हणजे भाषेचा सांगाडाच असतो.मराठी भाषा बोलायला जरी सोपी असली तरी तिला संपूर्ण समजून घ्यायला प्रत्येकाला जमणार नाही.त्याचप्रमाणे इंग्रजी ही बोलायला सोपी असली वाटली तरी बोलताना आपल्याला आपलं काय चुकत ते कळत.मराठी भाषेप्रमाणे इंग्रजीत सुद्धा मुख्य तीन काळ आहेत.
Types Of Tense : 1) Present Tense (वर्तमानकाळ) 2) Past Tense (भूतकाळ) 3) Future Tense (भविष्यकाळ)
टिप्स : मराठीमध्ये साध्या वाक्याचे सूत्र
उदा : मी आंबा खातो.
सूत्र : कर्ता + कर्म + क्रियापद असे असते पण इंग्रजीमध्ये
Ex : I eat a mango
सूत्र : S + V + O असे असते.
यामध्ये S = Subject(कर्ता) ; V = Verb(क्रियापद) ; O = Object(कर्म)
◆ १) Present Tense (वर्तमानकाळ) : सध्या चालू असणाऱ्या घटना घडामोडीचा उल्लेख करण्यासाठी हा काळ वापरला जातो. वर्तमानकाळाचे चार पोटप्रकार पडतात.
(a) Simple Present Tense (साधा वर्तमानकाळ)
(b) Continuous Present Tense (चालू वर्तमानकाळ)
(c)Perfect Present Tense (पूर्ण वर्तमानकाळ)
(d) Present Perfect Continuous Tense (चालू पूर्ण वर्तमानकाळ)
◆ (a) Simple Present Tense (साधा वर्तमानकाळ) : वर्तमान क्षणी घडणारी गोष्ट व्यक्त केली जाते, नेहमीच्या सवयी, क्रिकेट किंवा अन्य खेळांचा धावता वृत्तांत देण्याकरिता या काळाचा वापर केला जातो.
Ex : १. मी शाळेला जातो.
I go to school.
२. आम्ही क्रिकेट खेळतो.
We play cricket.
सूत्र : कर्ता + क्रियापदाचे मूळ रूप + कर्म
साध्या वर्तमानकाळामध्ये कर्ता जर तृतीय पुरुषी एकवचनी असेल तर क्रियापदाला s किंवा es हा प्रत्यय लागतो.तृतीय पुरुषी एकवचनी म्हणजे He, She किंवा It यापैकी एक.
Ex : राम आंबा खातो.
Ram eats a mango.
◆ (b) Continuous Present Tense (चालू वर्तमानकाळ) : चालू वर्तमानकाळाचा उपयोग बोलण्याच्या क्षणी चालू असलेली क्रिया दर्शवण्यासाठी करतात, चालू वर्तमानकालिन to be ची रूपे am, is, are आहेत.
Ex : १. राम आंबा खात आहे.
Ram is eating a mango.
२. मी शाळेला जात आहे.
I am going to school.
सूत्र : कर्ता + am, is, are + मूळ क्रियापद + ing + कर्म
(c)Perfect Present Tense (पूर्ण वर्तमानकाळ) : एखादी क्रिया नुकतीच पूर्ण झाली आहे किंवा बोलण्याच्या वेळेस पूर्ण झाली आहे, हे व्यक्त करण्यासाठी हा काळ वापरतात. पूर्ण वर्तमानकालीन to be ची रूपे to have, has आहेत.
Ex : त्याने आंबा खाल्ला.
He has eaten a mango.
सूत्र : कर्ता + have/has + मूळ क्रियापदाचे तिसरे रूप + कर्म
(d) Present Perfect Continuous Tense (चालू पूर्ण वर्तमानकाळ) : एखादी क्रिया भूतकाळातील विशिष्ट वेळेपासून सुरू झालेली होती आणि ती क्रिया अजूनही चालू आहे. हे सांगण्यासाठी हा काळ वापरला जातो. या वाक्यामध्ये since/for हे काल वाचक शब्द असतात.
Ex : ते चार वाजल्यापासून खेळत आहेत.
They have been playing since four o'clock.
सूत्र : कर्ता + have/has + been + क्रियापद + ing + कर्म
2. Past Tense (भूतकाळ) : भूतकाळात घडलेली क्रिया सांगण्यासाठी हा काळ वापरला जातो.
(a) Simple Past Tense(साधा भूतकाळ)
(b) Continuous Past Tense(चालू भूतकाळ)
(c) Perfect Past Tense(पूर्ण भूतकाळ)
(d) Past Perfect Continuous Tense(चालू पूर्ण भूतकाळ)
A. Simple Past Tense(साधा भूतकाळ) :
Ex : १) त्याने एक साप पाहिला.
He saw a snake.
२) आम्ही पत्रे लिहिली.
We wrote letters.
सूत्र : कर्ता + मूळ क्रियापदाचे दुसरे रूप + कर्म
(b) Continuous Past Tense(चालू भूतकाळ) : एखादी गोस्ट भूतकाळात विशिष्ट वेळी चालू होती हे सांगण्यासाठी हा काळ वापरला जातो. चालू भूतकालीन to be चे रूप was, were आहेत.
Ex : राम आंबा खात होता.
Ram was eating a mango.
सूत्र : कर्ता + was/were + मूळ क्रियापद + ing + कर्म
(c) Perfect Past Tense(पूर्ण भूतकाळ) : भूतकाळात एका विशिष्ट वेळेच्या पूर्वी झालेली क्रिया सांगण्यासाठी हा काळ वापरतात. पूर्ण भूतकालीन to be चे रूप had हे आहे.
Ex : रामने आंबा खाल्ला होता.
Ram had eaten a mango.
सूत्र : कर्ता + had + मूळ क्रियापदाचे तिसरे रूप + कर्म
(d) Past Perfect Continuous Tense(चालू पूर्ण भूतकाळ) : भूतकालीन एका विशिष्ट वेळेपासून आधी चालू झालेली क्रिया भूतकाळातील एका विशिष्ट वेळेपर्यंत चालू होती.हे सांगण्यासाठी हा काळ वापरला जातो.
Ex : तो मला टाळाटाळ करत होता.
He had been avoiding me.
सूत्र : कर्ता + had + been + क्रियापद + ing + कर्म
3. Future Tense(भविष्यकाळ) : जी घटना अद्याप घडायची आहे किंवा भविष्यात घडणार आहे.ती व्यक्त करण्यासाठी हा काळ वापरतात.भविष्यकालीन to be ची रूपे shall,will अशी आहेत.
(a) Simple Future Tense(साधा भविष्यकाळ)
(b) Continuous Future Tense(चालू भविष्यकाळ)
(c) Perfect Future Tense(पूर्ण भविष्यकाळ)
(d) Future Perfect Continuous Tense(चालू पूर्ण भविष्यकाळ)
A) Simple Future Tense(साधा भविष्यकाळ) :
Ex : मी शाळेला जाईन.
I shall go to school.
सूत्र : कर्ता + shall/will + मुख्य क्रियापद + कर्म
जर भविष्यकालीन वाक्यामध्ये आज्ञा, विनंती, निश्चय व्यक्त करायचा असेल तर will व shall सहाय्यकारी क्रियापदाचा वापर उलट्या पद्धतीने करावा.
Ex : १) मी तुला पाहून घेईन.
I will see you.
२) हे तू करच.
You shall do it.
सूत्र : कर्ता + am / is / are + going to + मूळ क्रियापद + कर्म
B) Continuous Future Tense(चालू भविष्यकाळ) : भविष्यकाळात एखादी क्रिया चालू असेल हे दर्शवण्यासाठी हा काळ वापरतात.
Ex : ते पत्र वाचत असतील.
They will be reading the letter.
सूत्र : कर्ता + shall/will + be + मूळ क्रियापद + ing + कर्म
C) Perfect Future Tense(पूर्ण भविष्यकाळ) :
भविष्यकाळात एका विशिष्ट वेळी क्रिया पूर्ण झालेली असेल हे सांगण्यासाठी हा काळ वापरतात.
Ex : मी उद्या माझा गृहपाठ पूर्ण केलेला असेन.
Tomorrow I shall have completed my home-work.
सूत्र : कर्ता + shall/will + have + मूळ क्रियापदाचे तिसरे रूप + कर्म
D) Future Perfect Continuous Tense(चालू पूर्ण भविष्यकाळ) : भविष्यकाळातील एका विशिष्ट वेळेपासून चालू झालेली क्रिया भविष्यकाळातील एका विशिष्ट वेळेपर्यंत चालू असेल हे सांगण्यासाठी हा काळ वापरतात.
Ex : मी प्रवासात असेन.
I shall have been traveling.
सूत्र : कर्ता + shall/will + have been + क्रियापद + ing + कर्म
0 टिप्पण्या