गमतीदार गोष्टी - amhi marathi काही आधुनिक व्याख्या
१) कॉलेज - अशी जागा जिथे काही तरुण शिक्षणाच्या मार्गाने जातात तर काही तरुण (पोरींच्या) प्रेमाच्या मार्गाने शिकतात.
२) अफवा - आवाजाच्या वेगापेक्षा जास्त वेगाने पसरणारी बातमी.
३) समिती - अशा लोकांचा घोळका ज्यांना एकट्याने काही जमत नाही आणि एकत्र बसून ठरवतात की एकत्र येऊन आपल्याने काही होणार नाही.
४) गुन्हेगार - हा इतर चार-चौघासारखाच माणूस असतो. फरक इतकाच की तो पकडला जातो.(चोरीच्या नावाने)
५) आटोमबॉम्ब - इतर सगळ्या शोधाची वाट लावू शकणारा शक्तीशाली शोध.
६) पेन - दुसऱ्याकडून घेऊन परत न करण्याची वस्तू.
७) बाग - भेळ, शेवपुरी वगैरे खाऊन कचरा टाकण्याची जागा.
८) जांभई - विवाहित पुरुषांना तोड उघडण्याची एकमेव संधी.
९) सिगारेट - वाळका पाला भरलेली एक सूरनळी. जिच्या एक टोकाला आग आणि दुसऱ्या टोकाला मूर्ख माणूस!
१०) प्रेमप्रकरण - क्रिकेटसारखच एक खेळ. जिथे पाच दिवसांच्या 'कसोटीपेक्षा झटपट वन डे' सामनेच अधिक लोकप्रिय असतात.
११) विध्यार्थी - आपल्या शिक्षकांना काहीही ज्ञान नाही असे मानून आत्मकेंद्रित राहणारा एक जीव.
१२) कार्यालय - घरगुती तनावानंतर विश्रांती मिळण्याची हक्काची जागा.
१३) शब्दकोश - जिथे 'लग्ना' आधीच 'घटस्फोट' येतो असे स्थळ.
१४) कपबशी - नवरा-बायकोच्या भांडणात बळी जाणारी वस्तू.
१५) चंद्र - कवीच्या तावडीत सापडलेला एक दुर्दैवी ग्रह.
आपल्या ब्लॉगला शेयर करा तुमच्या मित्रांसोबत आणि ब्लॉग कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा.अशाच मराठी जोक्स, मराठी हास्य विनोद, नवरा बायको मराठी विनोद आणि याच प्रकारच्या विविध विनोदांसाठी आपल्या ब्लॉगला भेट द्यायला विसरू नका.गमतीदार जोक्स, मराठी विनोद, मराठी जोक्स, मराठी उखाणे, गमतीदार गोष्टी, आधुनिक व्याख्या, आम्ही मराठी, मी मराठी इत्यादी.
1 टिप्पण्या
खूप छान
उत्तर द्याहटवा