◆ Part Of Speech : ( शब्दांच्या जाती ) : 




एखाद्या अर्थपूर्ण अक्षर समूहास शब्द असे म्हणतात. शब्दांनी भाषा बनत असते आणि भाषेतील शब्द हा महत्वपुर्ण घटक आहे.शब्दांच्या एकूण आठ जाती आहेत.यालाच इंग्रजीमध्ये Part Of Speech असे म्हणतात.


१)Noun.          ५)Adverb
२)Pronoun.    ६) Preposition
३) Adjective.  ७) Conjunction
४)Verb.           ८) Interjection


१) NOUN (नाम) : दृश्य, अदृश्य व्यक्ती, वस्तू किंवा ठिकाणाच्या नावाला Noun (नाम) असे म्हणतात.
EX : Ram, Boy, Table , Bat, Girl.
                               Noun
                               
(A) Proper Noun (विषेशनाम) : खास करून ठेवलेल्या नावाला Proper Noun (विषेशनाम)  म्हणतात.
Ex : Ram, Seeta, Ratnagiri, Guhagar, Marathi etc.


(B) Commam Noun (सामान्यनाम) :
एकाच प्रकारच्या अनेक व्यक्ती, वस्तू किंवा ठिकाणासाठी वापरलेले एक नाव म्हणजे Comman Noun होय.
Ex : Boy, Girl, city, River etc.


(C) Collective Noun (समूहवाचक नाम)
(D) Abstract Noun (भाववाचक नाम)
(E) Material Noun (पदार्थवाचक नाम)


◆ २) Pronoun (सर्वनाम) : एखाद्या नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी नामाऐवजी येणाऱ्या शब्दास Pronoun (सर्वनाम) म्हणतात.
Ex : Geeta is a clever girl but she is poor.
Pronoun


                       एकवचनी  अनेकवचनी
प्रथम पुरुषी             I               We
द्वितीय पुरुषी        You           You
तृतीय पुरुषी     He, She, It    They


3) Adjective (विशेषण) : नाम किंवा सर्वनामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दास Adjective (विशेषण) म्हणतात.
Ex : Ram is a clever boy.

वरील वाक्यातील clever हा शब्द राम या नामाबद्दल अधिक माहिती सांगतो म्हणून clever हे विशेषण आहे.

4) Verb (क्रियापद) : वाक्यातील क्रिया किंवा कृती दर्शक पदास Verb (क्रियापद) असे म्हणतात.
Ex : Ram drinks milk.


5) Adverb (क्रियाविशेषण) :
क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दास Adverb (क्रियाविशेषण) असे म्हणतात.
Ex : Ram runs fast.
वरील पहिल्या वाक्यातील fast हा शब्द Ram कसा धावतो हे दाखवतो.


6) Preposition (शब्दयोगी अव्यय)
: दोन शब्दामधील किंवा दोन नामांमधील संबंध दर्शवणाऱ्या शब्दास Preposition (शब्दयोगी अव्यय) असे म्हणतात.
Ex : The book is on the table.

SOME PREPOSITION : In,on,over,Under,into,to, towards,Up,Down,Out of, from, Around etc.


7) Conjunction (उभयान्वयी अव्यय) : दोन शब्दांना किंवा दोन वाक्यांना एकत्र जोडणाऱ्या शब्दास Conjuction (उभयान्वयी अव्यय)असे म्हणतात.
Ex : Radha and Meena are sisters.
SOME PREPOSITION : But,or,and, because,that,so,since,it,till etc.


8) Interjection (केवलप्रयोगी अव्यय)
: बोलणाऱ्यांच्या मनातील भावना प्रकट करण्यासाठी अरे! अरेरे! बापरे! असे नकळत बोलतो त्याला Interjection (केवलप्रयोगी अव्यय) असे म्हणतात.
Ex : Hellow ! What are you doing ?
SOME PREPOSITION : Alas! Ah! Hellow! Hurrah! Oh! etc.